चालता चालता खूप लांब,
गुरुजी आमचे चालून गेले।
काटयाकुटांच्या वाटेवरुन,
फुलबागेचा पाया झाले।।
भवभूति शिक्षण संस्थेची,
रचना सुंदर करुन गेले।
उन्हातान्हात सोसल्या झळा,
आज सावली झाले।
चालत आहोत फुलबागेत आम्हीं,तुम्हां गमावल्याचे दु:ख घेऊन।।
राजकारणाच्या परिधित,
जनसंघाचा दीप लावला घरोघरी।
सत्तेचा मार्ग मोकळा केला तेव्हा,
अन् अनेकांचे राजकीय गुरु झाले।
चालत आहोत फुलबागेत आम्हीं,तुम्हां गमावल्याचे दु:ख घेवून।।
नवनिर्माणात या राष्ट्राच्या,
नवचेतना बनून जगून गेले।
होते जे देवदूत आकाशाचे,
आज धरतीचे तारे झाले।
चालत आहोत फुलबागेत आम्हीं,तुम्हां गमावल्याचे दुःख घेवून।।
-ओ सी पटले
- हम उम्मीद करते हैं कि यह पाठक की स्वरचित रचना है। अपनी रचना भेजने के लिए यहां क्लिक करें।
कमेंट
कमेंट X